ती भाजपाची अधिकृत भूमिका नाही ; सुधीर मुनगंटीवार

मुंबई, वृत्तसेवा । राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. तशी मागणी भाजपने केलेली नाही. ती राणेंची वैयक्तिक मागणी आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या खासदार नारायण राणे यांना त्यांच्याच पक्षाने झटका दिला आहे. कारण नारायण राणें यांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका किंवा मागणी नाही, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केल्याने त्यांच्याच पक्षाने त्यांना झटका दिला आहे. ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

Protected Content