तळेगाव आरोग्य केंद्रातील डॉ. सोनवणे यांना बदलीनिमित्त निरोप

talegaon news

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. प्रमोद सोनवणे यांची मोरांबा (ता.अक्कलकुवा, जि.नंदुरबार) येथे बदली झाल्याने आज (दि.२७) त्यांचा तळेगाव ग्रामस्थांच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी तालुका व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ नेते प्रदिप देशमुख अध्यक्षस्थानी होते. डॉ.सोनवणे यांच्यामुळे गोरगरिबांना उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सेवा मिळू शकली, येथील आरोग्य केंद्राला डॉ.आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे व ते जिथे जातील तेथे संधीचे सोने करतील व नंदुरबारचेही नाव आरोग्य क्षेत्रात देशपातळीवर नेतील असा विश्वास व्यक्त करून डॉ.सोनवणे यांना भावी वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. जि.प. सदस्य अतुल देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शिकाऊ कालावधीत उत्कृष्ट आरोग्य सेवा दिल्याबद्दल पाटणादेवी येथील डॉ.अभिजित खर्चाणे यांचाही गौरव करण्यात आला.

तळेगावचे सुपुत्र नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष सांगळे यांनीही डॉ. सोनवणे यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. सांगळे यांचेही यावेळी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सहाय्यक गटविकास अधिकारी अजितसिंह पवार यांनीही डॉ.सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव केला. यावेळी प.स. सदस्य विष्णू चकोर, सरपंच सौ.सारिका राठोड, आरोग्य केंद्रातील व्दितीय वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा राजपुत, आरोग्य सहाय्यिका सौ सुनंदा महाजन, आरोग्य सेवक विजय देशमुख, संतोष राठोड, ग्रामपंचायत सदस्य राजू शितोळे, भोजूशेठ जैन, श्री. गोरे, पराग कासार, अनिल राठोड, जितू निकम, अनिल पगारे, सचिन गायकवाड, सुभाष काकडे, एल.सी. जाधव, विठ्ठल चव्हाण, पुष्पा शिनकर यांच्यासह ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन अनिल पगारे यांनी केले.

Protected Content