राष्ट्रसंत गाडगेबाबांची शिकवण प्रत्येकाने अंगिकारावी – आ. सावकारे (व्हिडीओ)

bhusawal 2

भुसावळ प्रतिनिधी । स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाची आहे. स्वतः संत गाडगेबाबांनी स्वच्छतेची खरी सुरुवात केली आहे. वातावरण स्वच्छ तर मन प्रसन्न राहिल. स्वच्छतेचे बाळकडु त्यांनीच दिले असून त्यासाठी संत गाडगेबाबांची शिकवण प्रत्येकाने अंगिकारावी, असे प्रतिपादन आ. संजय सावकारे यांनी केले. आज २७ रोजी संतोषी माता सभागृहात आयोजित महाराष्ट्र राज्य परदेशी धोबी समाजाच्या १३ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते.

यावेळी आ. सावकारे पुढे म्हणाले की, प्रत्येकाने गाडगेबाबांची शिकवण घेवून स्वच्छता ठेवल्यास निरोगी आरोग्य ठेवता येईल. प्रत्येक समाजात चांगल्या कामात अडथळे आणणारे बरेच असतात. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चांगल्या लोकांना पाठबळ दयायला हवे. समाजात कुठल्याही परिस्थितीत गटबाजी नको. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक असून विविध योजनांचे फायदे घ्यायला पाहिजे. शिक्षणामुळे अनेक तरुण अधिकारी बनतात. शासकीय मदतीची कुठलीही वाट न पाहता समाजातील काही आर्थीकदृष्टया सक्षम मंडळींनी गरिबांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

नेत्यांना जनता नेते बनवते मात्र अनेक पुढारी पांढऱ्‍या कपड्यांमुळे बदनाम झाले आहेत. समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री व समाजकल्याण मंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न राहिल. प्रत्येक समाजात गरीब घटक असून त्यांना मदतीची गरज आहे. समाज सभागृहासाठी १० लाख रुपये निधीची घोषणाही त्यांनी यावेळी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य धोबी परिट समाज महासंघाचे सर्व भाषिक संस्थापक अध्यक्ष देवराम सोनटक्के, कार्याध्यक्ष अनिल शिंदे यांनी समाजावर गत अनेक वर्षांपासून आरक्षणा अभावी होत असलेल्या अन्यायाबाबत राज्य सरकारवर सडकुन टिका केली. तसेच जगन्नाथ चौधरी, अ‍ॅड. राणीताई तळेले, ओमप्रकाश बुंदेले, शंकर परदेशी, राजु परदेशी आदींनी समाजहितासाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक पिंटू कोठारी, महाराष्ट्र राज्य परदेशी धोबी समाजाचे माजी प्रांतिक अध्यक्ष नरेंद्र परदेशी, भगवान परदेशी, अ‍ॅड. राणी तळेकर, अरुणा रायपुरे, शंकरराव निंबाळकर, रमेश लिंगायत, शाम वाघ, दिपक बाविस्कर, रामसुगर बुंदेले, शंकर परदेशी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात रागिणी परेदशी यांनी स्वागतगीत सादर केले. आ. संजय सावकारे व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
यानंतर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला भजन सादर करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी भुसावळ परदेशी धोबी समाजाचे अध्यक्ष जितु परदेशी, अधिवेशन समिती अध्यक्ष मानसिंग परदेशी, सेव्रेâटरी मिलींद परदेशी, अशोक परदेशी, गंगवा परदेशी, मदन परदेशी, राजेश परदेशी, पवन परदेशी, राजन परदेशी, प्रविण परदेशी, संजय परदेशी, राजेश केशव, रवि परदेशी, भगवान नामदेव, राजु मंगल, दगडू गुलाब, आनंद हरसिंग, गणेश परदेशी, मुकेश परेदशी, विशाल देवचंद, विजय मंगल, सुमित परेदशी, मनोज परदेशी, निलेश रामचंद्र, मनोज शामलाल, सुरेश हनुमान, चंदन हरसिंग, मधु भावसिंग, भटु परदेशी, जयेश परदेशी, चंद्रभान काशिनाथ, प्रदीप परदेशी, योगेश परदेशी, विजय जालमसिंग, गुलाब परदेशी, बंटी परदेशी, मुन्ना परदेशी, तुषार परदेशी आदी समाजबांधवांनी परिश्रम घेतले. यावेळी राज्यभरातुन आलेले समाजबांधव व महिलावर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन अशोक धोबी, राजेश बन्सी धोबी यांनी केले.

Protected Content