सावदा येथे आ.चंद्रकांत पाटील यांचे निधीतुन जलकुंभ मंजुर

सावदा ता. रावेर (प्रतिनिधी)।  आमदार चंद्रकांत पाटील यांचे निधीतून सावदा येथे जलकुंभ मंजूर झाले असून शासनातर्फे जिल्हाअधिकारी कार्यालयात तसे पत्र  प्राप्त झाले आहे.

सावदा नगरपरिषद जवळ ०.४५ एमएलडी क्षमतेचा एक जलकुंभ सन १ ९ ७१ रोजी बांधकाम केलेला असून त्यास सुमारे ४ ९ वर्षे होवून गेलं आहे.सदरील जलकुंभ आजरोजी खुपच जिर्ण झालेला असून त्याचे बांधकाम फारच जुने असल्याने पडत आहे . सदरील जलकुंभ दुरुस्त करूनही वापरात आणता येणार नसल्याने सावदा नगरपरिषदेने सर्व साधारण सभा ठरावानुसार सदरचा जलकुंभपाडून नवीन बांधकाम करणेबाबतचा ठराव पारीत केलेला होता. सदरील जलकुंभ नवीन बांधकाम झाल्यास सावदा शहरातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.तसेच सदरील काम लोकाभिमुख असल्याने जलकुंभाचे काम त्वरीत हाती घेण्यात येवून पूर्णत्वास आणणे आवश्यक आहे. जलकुंभासाठी लागणारा निधी रक्कम रूपय ६५ लाख निधीची आवश्यकता असल्याने आपण आपले निधीतून वा इतर योजनेतील निधी प्राप्त करून दिल्यास जलकुंभाचे काम हाती घेता येईल, अशा आशयाचे निवेदन सावदा येथील राष्ट्रवादीचे गटनेते फिरोजखान तथा समस्त  नगरसेवकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले होते. त्याची पुर्तता आ.पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. समाधान व्यक्त होत आहे. आता लवकरात लवकर पालिकेकडून काम हाती घेण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रथमच आमदार पाटील यांच्याकडून सावदा पालिकेस भरीव निधी मिळाला असून एक चांगला उपक्रम आमदार यांचे माध्यमातून जनतेसमोर ठेवला जात आहे.

                                                            – राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1062907934167879/

Protected Content