हाथरस : सीबीआयकडून एफआयआर दाखल

हाथरस: वृत्तसंस्था । दलित मुलीच्या सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडात सीबीआयने उत्तर प्रदेश सरकारच्या सूचनेनुसार एफआयआर दाखल केला आहे. तपासही सुरू केला आहे. सीबीआयने नेमलेल्या पथकाने तपास सुरू केला आहे.

सीबीआयने हाथरसच्या एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या पूर्वी पीडितेच्या भावाने हाथरसच्या चंदपा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १४ सप्टेंबररोजी आरोपीने आपल्या बहिणीला बाजरीच्या शेतात गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारदार भावाने केला होता.

आता या घटनेला २७ दिवस झाले आहेत. प्रथम हाथरस पोलिसांनी तपास केला. नंतर एसआयटी आणि आता सीबीआयने तपास सुरू केला आहे. १४ सप्टेंबरचे सत्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी एसआयटीच्या निशाण्यावर गावातील ४० लोक होते. गावातील या ४० लोकांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे. घटना घडली तेव्हा हे ४० लोक शेतांमध्ये काम करत होते. यांमध्ये आरोपी आणि पीडितेचे कुटुंबीयांचा देखील समावेश आहे.

पीडित कुटुंबीय लखनऊला जात आहेत. उत्तर प्रदेश पोलिस कडक सुरक्षेत पीडित कुटुंबीयांना लखनऊला घेऊन जातील. १२ ऑक्टोबरला अलाहाबाद हायकोर्टाच्या पीठासमोर सुनावणी होईल. पीडित कुटुंबातील ५ लोक आणि काही नातेवाईक लखनऊला रवाना होतील. उत्तर प्रदेश पोलिस पीडित कुटुंबीयांना संरक्षणात लखनऊला घेऊन जातील. उत्तर प्रदेशचे पोलिस उपमहानिरीक्षक शलभ माथुर यांनी गावात जाऊन तयारीचा आढावा देखील घेतला आहे.

१ ऑक्टोबरला अलाहाबाद हायकोर्टाने दखल घेत उत्तर प्रदेशच्या गृह खात्याचे मुख्य सचिव अवनीश अवस्थी. पोलिस महासंचालक हितेशचंद्र अवस्थी, सहाय्यक पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांच्या व्यतिरिक्त हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार आणि पोलिस अधीक्षक राहिलेले विक्रांत वीर यांना देखील बोलावण्यात आले होते.

Protected Content