मोठी बातमी : बेदम मारहाणीत तरूणाचा मृत्यू: चार जण पोलीसांच्या ताब्यात !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीचा कट लागला आणि जुन्या वादातून एरंडोल तालुक्यातील रवंजे येथील एका २० वर्षीय तरूणाला बेदम मारहाण करून जखमी केले. त्याला जखमीवस्थेत रूग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे एरंडोल तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रकारणी  पोलीसांनी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आला. नामदेव अशोक कोळी (वय-२०) रा. रवंजे ता. एरंडोल असे मयत तरूणाचे नाव आहे. शेवटचे वृत्त आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

विश्वसनिय पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, नामदेव कोळी या तरुणाचा शुक्रवारी ७ जुलै रोजी सकाळी रवंजे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दुचाकीचा कट लावण्यावरून वाद झाला. तसेच यापूर्वीच्या वादाचा देखील राग होता. त्यानुसार चौघा संशयितांनी नामदेव कोळी या तरुणाला बेदम मारहाण केली. संशयितांनी तोंडावर व शरीरावर जोरदार मारहाण केल्याने त्यास बेशुद्धावस्थेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  घटनेची माहिती कळताच एरंडोलचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशी अंती पोलीसांनी लक्ष्मण गणपत माळी (वय-४३), आकाश सोमा कोळी (वय-२७), राजेंद्र सुकदेव महाजन (वय-४०), सुकलाल ईश्वर माळी ( वय-३७, सर्व राहणार रवंजे, ता.एरंडोल) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.  सर्व संशयितांना एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Protected Content