Home क्राईम विक्रेत्याच्या पैशांची चोरी करणारा जेरबंद

विक्रेत्याच्या पैशांची चोरी करणारा जेरबंद


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शेव मुरमुरे विक्री करणाऱ्या दुकानादाराच्या गल्ल्यातून ८ हजारांची रोकड लांबविणाऱ्या संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली असून चोरीतील रोकड हस्तगत केली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील बापू भिका भोई रा. भोई गल्ली पारोळा हे नगरपालिका चौकात शेव मुरमुरे विकत असतांत. दुकानात गिऱ्हाईक करत असतांना दुकानदाराचे लक्ष नसताना कॅरी बॅग मध्ये ठेवलेले ८ हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याबाबत पोलीसात तक्रार देण्यात आली होती. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी कारवाई करत संशयित आरोपी पकडण्याच्या सुचना दिल्यात. पो.कॉ. किशोर भोई, पो.कॉ. अभिजित पाटील, पो राहुल पाटील, पो कॉ आशिष गायकवाड, पो कॉ हेमचंद्र साबे यांनी कारवाई करत संशयित आरोपी राहुल धर्मा भोई रा. मराठे गल्ली पारोळा यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलीसांनी चोरीतील ७ हजार रूपये हस्तगत केले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो ना योगेश जाधव करीत आहे.


Protected Content

Play sound