श्रीलंकेत बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या १५६ वर

0 Explosions hit churches and hotels in Sri Lanka

कोलंबो (वृत्तसंस्था) श्रीलंकेच्या राजधानीत आज ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ४०० जण जखमी झाले आहेत. यात ३५ विदेशी पर्यटकांचा समावेशही आहे. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.

 

जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना, श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोटांद्वारे हादरा दिला. येथील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये एकूण सहा बॉम्बस्फोट झाले. यात आतापर्यंत १५६ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बट्टीकलोआ येथील चर्चमध्येही बॉम्बस्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले तर कोलंबोतील दोन फाइव्ह स्टार हॉटेलांतही बॉम्बस्फोट झाले आहेत. एका वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार, कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया येथील चर्चमध्येही स्फोट झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये अनेक विदेशी पर्यटक आहेत. दरम्यान, जगभरातील कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आपण कोलंबोतील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत व तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

Add Comment

Protected Content