दोंडाईचा जवळ बस-कंटेनरचा भीषण अपघात

शहादा प्रतिनिधी । एसटी बसला भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १३ प्रवासी जागीच ठार तर ४० जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री घडला.

याबाबत वृत्त असे की, औरंगाबाद-शहादा बस (क्र.एम.एच. २०-बी.एल. ३७५६) ही शहादा येथे येत असताना निमगूळ-दोंडाईचादरम्यान समोरून येणार्‍या कंटेनरने धडक दिली. त्यात संंपूर्ण बस उजव्या बाजूने कापली गेली. या अपघातात बस चालकासह १३ प्रवासी जागीच ठार झाले तर १३ प्रवासी गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये ९ पुरुष व चार महिला प्रवाशांचा समावेश आहे. जखमींपैकी ११ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.

Protected Content