चौकशीसाठी रॉबर्ट वाड्रा पुन्हा ईडीच्या कार्यालयात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उद्योगपती रॉबर्ट वाड्रा मनी लाँड्रिंग प्रकरणातील चौकशीसाठी आज पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीने काल (बुधवार) वाड्रा यांची सुमारे ६ तास चौकशी केली होती. वाड्रा यांच्याकडे त्यांच्या लंडनमधील मालमत्तेबाबत माहिती विचारण्यात आली होती. ईडीने वाड्रा यांच्याकडे काही ई-मेलबाबतही माहिती मागितली होती.

दिल्लीच्या एका कोर्टाने वाड्रा यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, वाड्रा यांनी चौकशीत पूर्ण सहकार्य केले पाहिजे असे स्पष्ट निर्देशही कोर्टाने दिले होते. प्रियांका गांधी यांनी बुधवारी औपचारिकपणे पक्षाच्या महासचिव पदाची जबाबदारी स्वीकारली. तत्पूर्वी, त्यांनी पती वाड्रा यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात सोडले. काँग्रेस वाड्रा यांच्या चौकशीनिमित्त भाजप बदला घेण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप लावू शकते असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. नुकताच राजकारणात अधिकृत प्रवेश केलेल्या प्रियांका गांधी यांनी वाड्रा यांना ईडीच्या कार्यालयात सोडण्याबरोबरच आपण पती आणि कुटुंबीयांसोबत आहोत असे स्पष्ट केले आहे. शिवाय या प्रकरणावर बोलताना त्यांनी आता कांग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष होणार याचे संकेतही दिले आहेत. दरम्यान,वाड्रा यांच्या चौकशीची दुसरी फेरी आज होत आहे आहे. वाड्रा यांचे वकील देखील ईडीच्या कार्यालयात अगोदरच पोहोचले होते.

Add Comment

Protected Content