अमळनेरात मालवाहू वाहनातून १३ हजाराची रोकड लांबविली; एकाला अटक

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील जपान जीन समोर उभ्या असलेल्या मालवाहू गाडीतून १३ हजार रुपयांची रोकड लांबवण्याची घटना घडली. याप्रकरणी एकाला अटक केली असून अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश रघुनाथ महाजन (वय-३०) रा. माळीवाडा अमळनेर हे कुरकुरे विक्री करण्याचे काम करतात. दरम्यान २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास ते शहरातील जपान जीन समोर त्यांची मालवाहू गाडी पार्किंगला लावली होती. व लघवी करण्यासाठी बाहेर गेले.  याचा फायदा घेत संशयित आरोपी दीपक पांडुरंग भोई (वय-३०) रा. तांबापुरा जळगाव याने मालवाहू गाडीतून १३ हजार रुपयांची रोकड चोरून नेले. या प्रकरणी नीलेश महाजन यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अमळनेर पोलिसांनी संशयित आरोपी दीपक भोई याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहे.

 

 

Protected Content