Home Cities अमळनेर अमळनेर-धुळे महामार्गावर अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला ; महसूल पथकाची लोंढवे...

अमळनेर-धुळे महामार्गावर अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला ; महसूल पथकाची लोंढवे फाट्याजवळ कारवाई

0
1


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर-धुळे रस्त्यावरील लोंढवे फाट्याजवळ अवैधरीत्या गौण खनिज वाळूची वाहतूक करणारा एक डंपर महसूल विभागाच्या पथकाने पकडला. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पकडण्यात आलेला डंपर व त्यातील वाळूसाठा पुढील कार्यवाहीसाठी अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे अमळनेर येथील अमळनेर-धुळे मार्गावर लोंढवे फाट्याजवळ तपासणीदरम्यान गौण खनिजाची अनधिकृत वाहतूक करणारा डंपर आढळून आला. संबंधित वाहनातून रेतीची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल पथकाने डंपर ताब्यात घेतला. त्यानंतर वाहनासह त्यातील रेती तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आली.

ही कारवाई उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग मयूर भंगाळे तसेच तहसीलदार डॉ. उमा ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महसूल विभागाच्या पथकात मंडळ अधिकारी वावडे भाग येथील पी. एस. पाटील यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी संदीप माळी (मांडळ), एम. आर. पाटील (जैतपीर), भूषण पाटील (बोहरा), दीपक पाटील (डांगर बुद्रुक), विकेश भोई (बाम्हणे), विक्रम कदम (शहापूर), कल्पेश कुँवर (रणाईचे बुद्रुक), भूषण बाविस्कर (धार), सचिन बमनाथ (करणखेडे) आणि जी. व्ही. पावरा (जुनोने) यांचा समावेश होता. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाकडून तपासणी व कारवाई केली जात आहे. लोंढवे फाट्याजवळ पकडण्यात आलेल्या डंपरप्रकरणी पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound