जळगाव बसस्थानकासमोर दोन रिक्षाचालकांमध्ये हाणामारी (व्हिडीओ)

66eef90d 3e28 4417 9e28 3f686e67cff8

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नवीन बसस्थानका समोर प्रवाशी भरण्याच्या वादातून आज दुपारी दोन रिक्षा चालकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. या हाणामारीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या हाणामारीत एक रिक्षाचालक जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बसस्थानका शेजारील झुणका भाकर केंद्राजवळ दोन रिक्षाचालकांमध्ये प्रवाशी भरण्यावरून वाद झाला. थोड्याच वेळात दोघांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. या हाणामारीत समोरच्या रिक्षा चालकाला काठीने मारण्याच्या प्रयत्नात दुसरा रिक्षाचालक तोल गेल्यामुळे खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला मार लागला आहे. दरम्यान,जखमी रिक्षा चालक दारू प्यायला असल्याचे कळते. तर त्याला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत दोघांचे नाव समजू शकलेले नव्हते.

[youtube https://www.youtube.com/watch?v=TsfebC0qk-w&w=650&h=350]

Add Comment

Protected Content