Home Cities जळगाव मनपाच्या स्थायी समितीची उद्या बैठक

मनपाच्या स्थायी समितीची उद्या बैठक

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिकेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक मनपाच्या प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात पार पडणार आहे. या बैठकीत प्रशासकीय कामकाजाशी संबंधित चार महत्त्वाचे विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले आहेत.

नगरसचिव मनोज शर्मा यांनी यासंदर्भात सभेची सूचना प्रसिद्ध केली असून, स्थायी समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. बैठकीतील पहिला विषय म्हणजे. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या स्थायी समिती सभेचे कार्यवृत्त कायम करणे हा आहे. मागील बैठकीत झालेल्या कामकाजाची अधिकृत नोंद आणि त्यातील निर्णयांना मान्यता देण्याची प्रक्रिया यावेळी पार पडणार आहे.

याशिवाय जळगाव महानगरपालिकेच्या विधी विषयक न्यायप्रविष्ट प्रकरणांचा आढावा घेतला जाणार आहे. १२ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीतील तीन साप्ताहिक अद्ययावत अहवालांची माहिती स्थायी समितीसमोर सादर करण्यात येणार आहे. मनपाशी संबंधित विविध न्यायालयीन प्रकरणांची सद्यस्थिती या अहवालांमधून स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम २८१ अन्वये अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाचा आगीसंदर्भातील अहवालही बैठकीत सादर केला जाणार आहे. दि. १ ऑगस्ट २०२६ ते दि. ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडलेल्या आगीच्या घटनांची माहिती या अहवालात असणार आहे. शहरातील अग्निशमन यंत्रणा आणि आपत्कालीन सेवांच्या कामकाजाच्या दृष्टीने या अहवालाला महत्त्व आहे.

तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०५ (२) व १०६ (१) (अ) अन्वये लेखा परीक्षण विभागाच्या साप्ताहिक लेखा तपासणी कामाचा अहवालही विचारार्थ ठेवण्यात आला आहे. दि. १९ ऑक्टोबर २०२६ ते दि. ३० ऑक्टोबर २०२६ अखेर संपणाऱ्या कालावधीतील लेखा तपासणीसंदर्भातील माहिती मुख्य लेखापरीक्षक विभागाकडून सभेसमोर मांडली जाणार आहे.

या बैठकीत मागील सभेचे कार्यवृत्त कायम करण्यासोबतच न्यायप्रविष्ट प्रकरणे, अग्निशमन विभागाचा आगीचा अहवाल आणि लेखा तपासणी अहवालांचा आढावा घेतला जाणार आहे.


Protected Content

Play sound