रावेर (प्रतिनिधी) भाजप, शिवसेना, रिपाई, रासप, शिवसंग्राम व रयत क्रांती संघटना यांच्या महायुतीच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार रक्षाताई निखिल खडसे यांच्या प्रचारार्थ चिनावल येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी रोहिणी खडसे यांनी विकासाच्या पाठीमागे उभे राहून रक्षाताई खडसे यांच्या कमळ या निशाणी समोरील बटण दाबून त्यांना बहुमताने निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले.
यावेळी रॅलीमध्ये पं.स. सभापती माधुरीताई नेमाडे, पं.स. सदस्या योगिता वानखेडे, रेखाताई बोडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद वायकोळे, बाजार समिती संचालक गोपाळ नेमाडे, योगेश बोरोले, सागर भारंबे, अरुण राणे, युवराज महाजन, राजेंद्र पाटील, नारायण नेमाडे, अशोक पाटील, भरत बोडे, शे. रईस शे. निजाम, शे. नदीम शे. लाल, भास्कर सरोदे, गणेश भारंबे, माधुरी महाजन, कविताताई किरंगे, धनश्रीताई नेमाडे, परेश महाजन, संदीप टोके, हितेश भंगाळे, मिलिंद बाक्षे, गोलू महाजन, विजय पाटील, नितीन पाटील, बबलू लोखंडे, अमोल लोखंडे, मकबूल तडवी, विजय वाघोदे, विनोद बावसकर, जितेंद्र वानखेडे, दीपक चौधरी, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.
यावेळी घेण्यात आलेल्या कॉर्नर सभेत मार्गदर्शन करताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, गेल्या साडेचार वर्षांपासून केंद्रात आणि राज्यात भाजप महायुतीचे सरकार आहे. दोन्ही सरकारांनी ‘सबका साथ सबका विकास’ या वचनाप्रमाणे समाजातील शेवटचा वंचित घटक डोळ्यासमोर ठेवून विविध योजना राबविल्या.
गेल्या ६० वर्षांत काँग्रेसच्या नेतृत्वात देश दिशाहीन होत चालला होता, घोटाळे वाढले होते या परिस्थितीत मागील निवडणुकीत देशाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार दिले तेव्हापासून देश भक्कम विकासाकडे वाटचाल करू लागला असून, त्यातून रस्ते पाणी उद्योग, युवक कौशल्य, शेती विकास अशा सर्वांगीण बाबतीतमोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची गंगा वेगाने वाहत आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे बाहेरील देशासोबतचे संबंध सुधारले, जे देश वाकडे चालले त्यांना मोदींनी वठणीवर आणले व देशाला सुरक्षित केले. एकनाथराव खडसे, गिरीश महाजन, हरिभाऊ जावळे, रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून आपल्या भागात विकास कामे होत आहेत. आपल्या भागाची विकासाच्या वाटेवर घौडदौड अशीच कायम ठेवण्यासाठी रक्षाताई यांना पुन्हा एकदा बहुमताने निवडून द्या, अशी त्यांनी मतदारांना यावेळी विनंती केली.
यावेळी व्यस्त प्रचारात रोहिणी खडसे यांनी गावात मयत ठिकाणी भेट देऊन खडसे परिवार आपल्या व्यस्ततेतही नेहमी सामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी होत असतो, याची प्रचिती दिली.त्याबद्दल चिनावल गावात त्यांचे कौतुक केले जात होते. यावेळी चिनावल ग्रामस्थांचा प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.