रावेरमध्ये काँग्रेस, भाजप आणि अपक्ष यांच्यात बहुरंगी लढत रंगणार

Raver rangat news

रावेर प्रतिनिधी । रावेर मतदार संघासाठी आज माघारीच्या दिवशी कोणीही माघार घेतली नाही. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात भाजपा, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि पाच अपक्ष उमेदवार उरले आहेत. त्यामुळे येथे बहुरंगी लढत रंगणार आहेत.

भाजपकडून ना. हरीभाऊ जावळे, काँग्रसचे माजी आमदार शिरीष चौधरी आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी, एमआयएमचे विवेक ठाकरे, बहुजन समाज पार्टीचे संतोष मधुकर ढिवरे, वंचित बहुजन आघाडीचे हाजी सय्यद मुस्ताक सय्यद कमरूद्दिन तर अपक्ष उमेदवार गयासउद्दिन सदरोद्दिन काझी, डी.डी.वाणी, राजाराम माधव सोनार आणि संजय हमीद तडवी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खरी लढत मात्र भाजपा, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्यातच होणार आहे.

Protected Content