जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एमआयडीसी, रामानंदनगर, तालुका पोलीस स्थानक आणि जिल्हा पेठ पोलीस स्थानकाच्या विद्यमानाने शहरातील संवेदनशील भागातून आज पोलिसांनी पथसंचलन केले.
शहरातील तांबापुर कंजर वाडा,कंवर नगर या भागातून पथसंचलन सकाळी नऊ ते अकरा वाजेच्या दरम्यान काढण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, जिल्हापेठ पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास सोनवणे, तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भागवत साहेब, रामानंद नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी श्री.केंद्रे साहेब यांच्यासह तीनशे कर्मचारी पथसंचलनमध्ये सहभागी होती.