नशिराबाद येथील अखंड हरिनाम कीर्तन व पारायण सप्ताह सोहळा उत्साहात

नशिराबाद प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक परिसरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या  अखंड हरिनाम कीर्तन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याची शुक्रवारी १९ नोव्हेंबर रोजी पालखी काढून सांगता करण्यात आली.

 

नशिराबाद शहरातील बसस्थानक परिसरात १२ नोव्हेंबरपासून  अखंड हरिनाम कीर्तन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दररोज सकाळी काकडा आरती व सायंकाळी भजन व रात्री किर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी सर्व र्कितनकार यांनी समाज प्रबोधन करून किर्तनात भाविकांनी मनसोक्त किर्तनाचा आनंद लुटला.  अखंड हरिनाम कीर्तन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याची शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० पालखी काढण्यात येवून किर्तन सप्ताहाची सांगता करण्यात आली. यावेळी भाविकभक्तांनी विविध भजने गायली. या दिंडी सोहळ्यात सर्वांनी वारकरी वेशभूषा करून टाळ, भजन, मृदंगाच्या गजरात सर्व परिसर भक्तिमय करण्यात आला होता.

 

याप्रसंगी माजी सरपंच विकास पाटील, माजी उपसरपंच किर्तीकांत चौबे, नशिराबाद शिक्षण मंडळचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, जनार्दन माळी, गणेश चव्हाण, हभप सुनिल शास्त्री महाराज, प्रभाकर महाराज, पंकज महाराज, प्रमोद महाराज, विशाल महाराज, रमेश पाटील, सुरेश माळी,  संजय महाराज, आबा पाटील, अशोक माळी, महेश माळी, मधूकर महाजन,सुनील माळी, संदीप जगताप, सोपान माळी, संतोष पवार, अशोक पवार, भास्कर पाटील, हेमराज महाजन, तेजस माळी आदि उपस्थित होते.

Protected Content