प्रलंबित मागण्यांसाठी पं.स.सभापतींसह सदस्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

mukyamantri

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्यांच्या प्रलंबित मागण्यांकरीता माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी दोन दिवसांपुर्वी विधानसभेत आवाज उठवला होता. त्यानंतर आज 27 जुन 2019 रोजी महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती व सदस्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात, आ.खडसे नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.

मुख्यमंत्र्यांनी सदरील निवेदनातील मागण्यांचा सरकार सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासित केले आहे. यावेळी समवेत माजी महसुलमंत्री आमदार एकनाथराव खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, पं.स.सदस्य संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे, कोरेगावचे सभापती रजाभाऊ जगदाळे, उस्मानाबादचे सभापती गजेंद्र जाधव, बोदवडचे सभापती गणेश पाटील, भुसावळच्या सभापती प्रीती पाटील, चोपड्याचे सभापती आत्माराम म्हाळके, चाळीसगावचे स्मितल बोरसे, पाचोऱ्याचे बन्सीभाऊ पाटील, माजी सभापती सुनील महाजन, पंचायत समिती सदस्य शेखर पाटील, विकास पाटील, गोलू पाटील, दिनेश बोरसे, जितेंद्र पाटील, किशोर गायकवाड, सरफराज तडवी, कमलाकर पाटिल, माजी उपसभापती मनीषाताई पाटील उपस्थित होते.

Protected Content