शेंदुर्णी येथील ‘कृतज्ञता सोहळा’ उत्साहात

शेंदुर्णी प्रतिनिधी । अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शेंदुर्णी येथील राणी लक्ष्मीबाई महिला सहकारी पतसंस्थेतर्फे ‘कृतज्ञता सोहळा’ आयोजित करण्यात आला होतो.

मर्यादित शेंदुर्णीच्या महिला अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, पदाधिकारी ,कार्यकारी मंडळ, सल्लागार मंडळ आणि कर्मचारी यांचा सामाजिक उत्तरदायित्वपूर्ती कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.

पतसंस्थेच्या वतीने महाविद्यालय आणि शाळा या दोन्ही ठिकाणी प्रांगणात लागवडीसाठी वृक्ष वाटप, वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपन करण्याचे कार्य करण्यात आले होते. यासाठीचे संपूर्ण आर्थिक सहाय्य पतसंस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यासंदर्भात सामाजिक उत्तरदायित्वपूर्तीचा गौरव व्हावा या उद्देशाने शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव सतीश चंद्र काशीद हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी गावातील सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था  एकत्रित येऊन अधिक चांगले कार्य करण्याचा आशावाद व्यक्त केला. पतसंस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तम थोरात यांनी आपल्या मनोगतात सहकाराची तत्वे ,संस्कार आणि समाज उद्धार यासंदर्भात सामाजिक कर्तव्य प्रतिपादित केली.

आतापर्यंत पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीत पतसंस्थेने केलेल्या कार्यांचा उल्लेखही त्यांनी केला. महिला प्रतिनिधी म्हणून ममता शीतल जैन यांनी आयोजकांचे आभार मानत या सत्कार सोहळ्यात आपण महिलांना प्रोत्साहन दिल्याची भावना व्यक्त केली. व भविष्यातही महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला आवडेल या स्वरूपात आशा व्यक्त केली. प्रास्ताविक आचार्य गरुड महाविद्यालयाचे प्राचार्य एस. पी उदार यांनी केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही आर पाटील यांनी सर्वाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

सदर सत्कार सोहळ्यास उपाध्यक्ष साधना फासे- वामन फासे, रेखा झंवर – प्रकाश झवर, सुनीता जोहरे, कीर्ती अग्रवाल, विजया पाटील,  ममता जैन – शीतल जैन, देवकाबाई वाघ, सुमन पाटील, अतुल जागीरदार, प्रदीप गुजर, दुर्गा चव्हाण, पूजा थोरात – निलेश थोरात, वर्षा थोरात, रवींद्र सूर्यवंशी, मोतीलाल माळी, सतीश बारी, संस्थेच्या संचालिका प्रा. देवाश्री काशीद यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतीक्षा गुजर आणि सुनिता पाटील यांनी महाविद्यालय गीत आणि वामन फासे यांनी सहकार गीत सादर केले. कार्यक्रमाचे आभार रीना पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. योगिता चौधरी प्रा वर्षा पवार, प्रा प्रतीक्षा गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालय आणि शाळा परिवारातील उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, प्राध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content