कासारखेडा येथील प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कासारखेडा येथील ४९ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी २ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विकास पुना कुंभार (वय-४९) रा. कासारखेडा ता. यावल हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. हाताला मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. आज बुधवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरात कुणीही नसतांना झोक्याच्या दोरीने छताला गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कैलास पंढरीनाथ कुंभार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहे.

Protected Content