मागील दहा वर्षात दळणवळण क्षेत्रात क्रांती – डॉ. केतकी पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मागील दहा वर्षांमध्ये भारतातील राष्ट्रीय महामार्ग हे दिवसाला 100 किलोमीटर धावत आहे. धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची असलेले चार धाम, 51 शक्तिपीठ, बारा ज्योतिर्लिंग अशा प्रकारे मोदी सरकारने राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणून दळणवळणास प्राधान्य दिले आहे. यात भारतीय रेल्वे कुठेही मागास राहू नये यासाठी मोदी सरकार ने भारतीय रेल्वेला आज जागतिक दृष्टिकोनातून एक आदर्श दळणवळण संस्था बनवलेले आहे. भारतीय रेल्वेमध्ये मागील 10 वर्षात झालेले अमुलाग्र बदल हे उल्लेखनीय आहे. त्यात रेल्वे स्टेशन वरती झालेली स्वच्छता, नीटनेटकेपणा, पेय जलव्यवस्था बरोबर भारतातील प्रमुख रेल्वे स्टेशन यांचे सुशोभीकरण, नवीन रेल्वेचे जाळे ओवर ब्रिज या आणि अशा प्रकारे रेल्वे मंत्रालयाला एक नवीन चकाकी देण्याचे कार्य मोदी सरकारने केले आहे. मागील दहा वर्षाचा आलेख पाहता स्वातंत्र्यानंतरचे हे दहा वर्ष दळणवळण व्यवस्थेच्या दृष्टीने आमुलाग्र ठरले असून क्रांती निर्माण झाल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकीताई पाटील यांनी केले.

देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आज अमृतभारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत 554 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास आणि 1500 रोड ओवर ब्रिज, अंडरपासचे भूमिपूजन आणि उद्घाटन करून राष्ट्रास अर्पण केले. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे सर्वच कार्य प्रत्येक देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. आजच्या या उद्घाटन सोहळ्यानंतर ध्येय धुरंधर मा.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे देशवासीयांना संबोधन दिले. हे संबोधन राष्ट्राच्या उन्नतीसाठी उभारी देणारे तर आहेच याच बरोबर 2047 मा.मोदींजीच्या स्वप्नांना भरारी देणारे आहे. हा कार्यक्रम मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ द्वारा आयोजित करण्यात आला होता.

भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष डॉ केतकीताई पाटील या सुनोदा गावातून जात असताना तेथे आयोजित कार्यक्रमात त्या सहभागी झाल्यात यावेळी सुनोदा गावचे सरपंच बिलिराम सीताराम वानखेडे, उपसरपंच सौ.वैशाली युवराज सपकाळे, ग्रामसेवक एम.आर.पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रेवा सदू फेगडे, रेल्वे नोडल अधिकारी अलोक वर्मा, रेल्वे कार्यालय अधीक्षक राजेश कुमार, रेल्वे कार्यालय अधीक्षक योगेश पाटील,मध्य रेल्वे भुसावळ मंडलचे कर्मचारी, गावकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content