एन. मुक्टोतर्फे मू.जे.महाविद्यालयात काळ्या फिती लावून आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने प्राध्यापकांच्या न्याय्य मागण्यासंदर्भात २९ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान आंदोलनाचा कृती कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्यानुसार एन. मुक्टो संघटनेच्या मूळजी जेठा महाविद्यालय स्थानिक शाखेने विविध मागण्यांसाठी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.

विविध मागण्यामध्ये महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये नव्वद टक्के प्राध्यापक भरती, जुलै २००९ पूर्वी एम. फिल पूर्ण करणाऱ्या प्राध्यापकांना सेवेसंदर्भातील सर्व लाभ देण्यात यावेत. प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ मुलाखत दिनांकापासून न देता पात्रता दिनांकापासून देण्यात यावे. जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांचा हक्क आहे आणि ती सर्वांना सरसकट लागू करण्यात यावी. ७१ दिवसांच्या आंदोलनासंदर्भात शासनाने न्यायालयाने शासनाला प्राध्यापकाचे थकीत वेतनावर ८% व्याज द्यावे, असे आदेश दिलेले होते. मात्र, शासनाने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. शासनाने तसे करू नये, या मागण्यासंदर्भात होणाऱ्या आंदोलनांची माहिती व त्याविषयीची चर्चा या आंदोलन निमित्त करण्यात आली. या वेळी एन मुक्टो संघटनेच्या मूळजी जेठा महाविद्यालय स्थानिक शाखेचे पदाधिकारी व सदस्य हजर होते.

Protected Content