यावल पंचायत समितीतील रवींद्र देशमुख यांची जामनेर येथे बदली

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील पंचायत समितीच्या पाणी टंचाई विभागात गेली तिन दशकापासुन कार्यरत असलेले कर्मचारी  रवींद्र प्रल्हाद देशमुख यांची जामनेर पंचायत समिती येथे बदली झाली आहे.

 

रवींद्र प्रल्हाद देशमुख हे मुळ हिवरखेडा तालुका जामनेर येथील रहीवाशी असुन, आपले शिक्षण पुर्ण झाल्यावर देशमुख यांनी यावल येथे ७ मार्च  १९९१या वर्षी पंचायत समितीत आपल्या प्रशासकीय सेवाकार्यास सुरुवात केली होती. यावल पंचायत समितीच्या कार्यालयात ग्रामीण पाणीटंचाई विभागात त्यांनी सतत ३२ वर्ष म्हणजेच तिन दशकापेक्षा अधिक काळ त्यांनी उत्कृष्ठरित्या एक उमदा व सर्व प्रिय असे कर्मचारी म्हणुन आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांची प्रजामनेर पंचायत समितीत बदली झाली.  यावल पंचायत समितीत मागील ३२ वर्ष सेवा करीत असतांना त्यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा एक मोठा कुटुंब निर्माण केले.  यावल पंचायत समितीचा पदभार सोडतांना रवींद्र देशमुख हे अत्यंत भावुक झाले होते. पण नोकरी  आली म्हणजे बदली असते असे सांगुन त्यांनी आपल्या जन्मभुमि असलेल्या जामनेर तालुक्याची आपल्यास सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद ही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांना यावल पंचायत समिती कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी , तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रूबाब तडवी, सचिव पी. व्ही. तळेले, हितेन्द्र महाजन , ग्रामसेवक मजीद तडवी,  संगणक विभागाचे मिलींद कुरकुरे, जावेद तडवी, अक्षय शिरसाठ, चेतन चौधरी यांच्यासह आदींनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

Protected Content