बीजमाता राहिबाई पोपरेंची अनिल भोकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांची कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली.

पद्मश्री राहिबाई भोकरे या नुकत्याच बहिणाबाई महोत्सव तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या कार्यक्रमानिमित्त जळगावात आल्या होत्या. त्यांची आवर्जून कृषी कार्यालयास भेट दिली. यानंतर त्यांनी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्या निवासस्थानी देखील सदिच्छा भेट दिली.

राहीबाई पोपरे या बीजांच्या शुध्दतेच्या आणि अर्थातच पारंपरीक शेतीच्या पुरस्कर्त्या असून पूर्णवेळ याच क्षेत्रात कार्यरत आहेत. तर कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी कृषी उपसंचालक पदाच्या माध्यमातून अतिशय भरीव कामगिरी केली आहे. कार्यतत्पर अधिकारी म्हणून ख्याती असणार्‍या अनिलजी भोकरे यांनी शासनाच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करून शेतकरी आणि शेतीमालावर प्रक्रिया उद्योगात धडपड करणार्‍या उद्योजकांना मोलाची मदत केली आहे. त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर विविध विषयांवर गप्पा रंगल्या

विषमुक्त शेती हा पद्मश्री राहीबाई पोपरे यांचा आवडीचा विषय असून अनिल भोकरे यांना देखील याची आवड आहे. ते देखील याचाच प्रचार-प्रसार करत असल्याने या विषयावर दोन्ही मान्यवरांनी चर्चा केली.

Protected Content