गोदावरीच्या मतदार जनजागृती रॅलीचे उज्ज्वला बेंडाळे यांच्याहस्ते उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च जळगाव महाविद्यालय आणि डॉ. वर्षा पाटील दुमेंन्स कॉलेज ऑफ कॉमप्युटर अॅप्लीकेशन जळगाव महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजीक बंधीलकी अंतर्गत मतदान जनजगृती अभियान रॅलीला सुरूवात करण्यात आली. भाजपाचे महानगरप्रमुख उज्जलाताई बेंडाळे, गोदावरी लक्ष्मी कॉ. बैंक उपव्यवस्थापक हितेंद्र शिंदे यांच्याहस्ते मतदान जनजगृती अभियानाचे उदघाटन थाटात करण्यात आले.

या प्रसंगी उज्वला बेंडाळे यांनी सांगितले की, मतदारांमध्ये जनजागृती निर्माण होणे हे फार आवश्यक आहे, व सुदृढ मतदानानेच उद्याची लोकशाही जन्माला येते. तसेच रॅलीत सहभागी झालेल्या सुमारे दोनशेच्या वर युवक व युवतींना मतदान करण्याचे आवाहन देखील केले. या कार्यक्रमास दोन्ही महाविद्यालयांचे सुमारे दीनशे विद्यार्थी व विद्यार्थीनींनी मतदानाशी संबंधीत पोस्टर हातात घेऊन गोदावरी लक्ष्मी कॉ. बँकपासून पुर्ण बाजार पेठ, सेंट्रल फुले मार्केट येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सुमारे १० हजार पेक्षा जास्त मतदान जनजागृतीचा संदेश देणाऱ्या लिफलेटचे वितरण केले. शिवाय याप्रसंगी “मतदार राजा जागृत” ही संकल्पना मनात ठेवुन पथनाटचाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

सदर पथनाटयाचे सुमारे ८ ते १० देखावे ठिकठिकाणी सादर करण्यात आले. गोदावरी इंस्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्व जळगाव महाविद्यालय तथा डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉप्युटर अॅप्लीकेशन जळगाव महाविद्यालय हे नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम राबण्यात अग्रस्थानी असते. संपुर्ण कार्यक्रमाची संकल्पना ही महीला महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. निलीमा वारके व प्रा. यौगीता होंगडे यांची होती. या प्रसंगी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. चंद्रकांत डोंगरे, संचालक डॉ. प्रर्शात वारके, प्राचार्या डॉ. निलीमा नारके, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content