Home Cities अमळनेर पाडळसरेत व्यायाम शाळेचे उद्घाटन

पाडळसरेत व्यायाम शाळेचे उद्घाटन

0
105


अमळनेर प्रतिनिधी ।  तालुक्यातील पाडळसरे येथे व्यायाम शाळेचे उद्घाटन नूतन उपसरपंच शिवाजी कौतिक पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

 

गेल्या कित्येक वर्षांपासून येथील व्यायाम शाळेची वास्तू साहित्य अभावी तशीच पडून होती. आता गावात युवकांसाठी नुकतेच सुसज्ज असे कसरतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध झाल्याने, या व्यायाम शाळेचे उदघाटन करण्यात आले.  हे उदघाटन नूतन उपसरपंच शिवाजी कौतिक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच शुभांगी सचिन पाटील,  ग्रा.प.सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, भावी पिढी समजल्या जाणाऱ्या युवकांसाठी गावातील व्यायाम शाळेत व्यायामाचे सुसज्ज असे साहित्य उपलब्ध झाल्याने युवकांनी, सरपंच उपसरपंच,  सदस्य तसेच ग्रामस्थांनी आजी-माजी आमदारांचे आभार मानले आहेत.


Protected Content

Play sound