माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांना पोलीस संरक्षण

जळगाव प्रतिनिधी । माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा देणारे अ‍ॅक्टीव्हीस्ट दीपक कुमार गुप्ता यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी वाळू माफियांनी धमक्या दिल्याच्या पार्श्‍वभूमिवर त्यांना संरक्षण पुरविण्यात आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते तथा सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा देणारे अ‍ॅक्टीव्हीस्ट दीपक कुमार प्यारेलाल गुप्ता (रा. ३८८, घरकूल, शिवाजीनगर, जळगाव ) यांना काही दिवसांपूर्वी वाळू माफियांनी पाहून घेण्याची धमकी दिली होती. या संदर्भात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यानंतर संबंधीतांनी देखील गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दीपक कुमार गुप्ता हे गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांच्या हितासाठी झटत असून त्यांना अनेकदा धमकावण्यात आले आहे. यातच अलीकडच्या काळात वाळू तस्करांनी अगदी भर दिवसा त्यांना थांबवून धमकावल्याने खळबळ उडाली होती. यानंतर गुप्ता यांनी आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे असा अर्ज केला होता. यानुसार त्यांना आजपासून पोलीस संरक्षण देण्यात आले असून दीपक कुमार गुप्ता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Protected Content