सावधान : साडे तीन महिन्यानंतर जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या शंभरीपार !

जळगाव प्रतिनिधी । कोरोना आटोक्यात आला म्हणून गाफील राहणार्‍यांसाठी प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात तब्बल साडे तीन महिन्यानंतर कोरोना बाधीतांची संख्या शंभरीच्या पार गेल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आज जळगाव jalgaon जिल्ह्यात १२४ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. मध्यंतरी यापेक्षा जास्त रूग्ण आढळून आल्याने हा आकडा तसा फारसा मोठा मानता येणार नाही. तथापि, २५ ऑक्टोबर नंतर पहिल्यांदाच एका दिवशी १०० पेक्षा जास्त रूग्ण आढळून आल्याची बाब लक्षात घेण्याची गरज आहे. अर्थात, तब्बल साडे तीन महिन्यानंतर कोरोना बाधीतांच्या संख्येने तीन आकडी संख्या गाठली आहे. jalgaon corona status

या बाबीचा विचार करता, जिल्ह्यातील नागरिकांनी सुरक्षेबाबत काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यात फिजीकल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायझेशनचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content