निंभोरा-पिंप्री- सेकमच्या सरपंच पदी ‘वंचित बहुजन आघाडी’च्या रोहिणी कोलते

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील महत्त्वाची असलेल्या  निंभोरा- पिंप्री सेकम गृप ग्राम पंचायतच्या सरपंच पदी ‘वंचित बहुजन आघाडी’च्या  रोहिणी कोलते यांची तर उपसरपंच पदी वंचित बहुजन आघाडीच्या उज्वला दिलीप तायडे यांची वर्णी लागली.

तालुक्यातील महत्त्वाची असलेल्या  निंभोरा- पिंप्री सेकम गृप ग्राम पंचायतच्या निवडणुकीत प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले ल्या वंचित बहुजन आघाडीने चांगले यश मिळवले होते. सरपंच पदा साठी सदर ग्राम पंचायत तीत ‘ सर्व साधारण महिला आरक्षण निघाले होते त्यात वंचित कडे रोहिणी कोलते ह्या ओ.बी.सी महिला असल्याने त्यांची सरपंचपदी वर्णी लागली व उपसरपंच पदी वंचित बहुजन आघाडीच्या उज्वला दिलीप तायडे यांची वर्णी लागली. 

निवड झाल्यावर माध्यमांशी बोलताना नव नियुक्त सरपंच यांनी सांगितले की  बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुळे मला हा सन्मान प्राप्त झाला असून तालुक्यात एक आदर्श ग्राम पंचायत म्हणून या ग्राम पंचायतला मान मिळवून देईल.

सदर प्रसंगी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे,गणेश सपकाळे जिल्हाध्यक्ष भिम आर्मी, जिल्हा महासचिव दिनेश इखारे पॅनल प्रमुख बालाजी पठाडे, गोटु सेठ चाहेल, संतोष कोळी भुसावळ तालुकाध्यक्ष, विक्रम प्रधान, विद्यासागर खरात, देवदत्त मकासरे, राहुल गवई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content