भुसावळात देशी कट्टा जप्त

भुसावळ प्रतिनिधी । येथील शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने गौरव वाघ या तरूणाकडून देशी कट्टा जप्त करून त्याला गजाआड केले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गौरव राजू वाघ (रा. शिवाजीनगर भुसावळ ) याच्याकडे देशी कट्टा असल्याची गुप्ता माहिती शहर पोलीस स्थानकाला मिळाली होती. यानुसार पोहेकॉ संजय पाटील, पो.ना. सुनिल सैदाणे व विजय पाटील यांनी गौरव राजु वाघ याच्याकडुन सुमारे दहा हजार रूपये किंमतीचा एक देशी कट्टा हस्तगत केला आहे. या प्रकरणी पुढील तपास शहर पोलीस स्थानकातर्फे सुरू आहे.

Add Comment

Protected Content