भुसावळात न्यूमोकोकल लसीकरणाची सुरुवात

भुसावळ प्रतिनिधी । न्यूमोकोकल (न्यूमोनिया प्रतिबंधक पीसीव्ही लस)  लसीचा समावेश शासकीय पातळीवरून नियमित लसीकरण कार्यक्रमात आजपासुन समावेश करण्यात आला असून वरणगाव नारपालिकाचे नगरसेवक, राजेन्द्र चौधरी व प्रदिप मराठे यांचा हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

जाणून घ्या लसी संदर्भात आधिक मा‍हिती :- ही लस 1 वर्षाचे वयाचे आतील बालकांना द्यावयाची आहे. हया लसीचे 3 डोस द्यायचे असतात. जर 1वर्ष पूर्ण व्हायला काही दिवस कमी असतांना त्या मुलाला पहिला डोस दिला गेला तर पुढील राहिलेले 2 डोस बालक जरी 1 वर्षाचे वर झाले तरी देता येते. करोना हा आजारात स्वसन मार्गाला प्रादुर्भाव होऊन न्यूमोनिया आजार संभवतो. पुढील करोनाची लाट लहान मुलांना प्रादुर्भाव करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा पार्शवभूमीवर  PCV लस लहान मुलांना नियमित लसीकरणद्वारे मिळाल्यास त्यांचा न्यूमोनिला आजारापासून बचाव होऊ शकेल. आतापर्यंत खाजगी डाँ. कडे ही लस उपलब्ध होती व त्याचा 1 डोस 2 ते हजार रु.दरम्यान पडतो ते गरीब कुटुंबाला शक्य नसते. त्यामुळे ही लस  सर्व पालकांनी आपल्या मुलांना लस द्यावी असे आव्हान वरणगाव नारपालिकाचे नगरसेवक, राजेन्द्र चौधरी व त्याचा सोबत प्रदिप मराठे यांनी हया लसीचा शुभारंभ त्यांचे हस्ते वरणगावचे दत्त क्लीनिक न. पा. कार्यालया समोर येथील लसीकरण केंद्रावर प्रातिनिधिक स्वरूपात 10 बालकांना  PCV लस देणेत आली.

तसेच बालकांना इतर नियमित लसी देणेचे कार्य करणेत आले. प्रा.आ.केंद्र :-कठोरा खु.येथील  मा. वैद्यकीय अधिकारी डाँ.  शुभांगी फेगडे, डाँ. सीमा सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांची लसीकरण टीम मध्ये व्ही आर सारडे (आ. पर्यवेक्षक ),  एल. एम. लोखंडे सिस्टर,(ANM), सुनीता खाचणे (अटेंडंट), आशा स्वयंसेविका उपस्थित होते. तसेच वरणगाव चे अक्सानगर भागातील अंगणवाडी केंद्रात पण आजच डाँ. शे.वसीम खान यांचे उपस्थितीत  प्रातिनिधिक स्वरूपात 10 बाळांना PCV चे लसीकरण करणेत आले. येथील टीम मध्ये लस टोचक श्रीमती निकुंबे सिस्टर, श्री डी. पी. माळी (आ.कर्मचारी) श्रीमती उषा चौधरी, संजीवनी चौधरी(आशा स्वयंसेविका)व श्रीमती संगीता माळी ( गटप्रवर्तक) ह्यांनी आजचे लसीकरण कार्य केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!