जळगावात सामूहिक गौसेवा अनुष्ठान उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हिंदू-मुस्लिम समाज बांधव व वीर सावरकर रिक्षा युनियन तर्फे पाझरपोळ गौशाला जळगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,रमजान ईद व अक्षय तृतीया च्या निमित्ताने  सामूहिक गौसेवा करण्यात आली.

यावेळी प्रमुख उपस्थिती श्री लीलाधर कानडे,जळगाव शहर वाहतूक निरीक्षक,गौसेवाव्रती ऍड.  विजय काबरा, दिलीपभाऊ सपकाळे -जिल्हाध्यक्ष वीर सावरकर रिक्षा युनियन यांची उपस्थिती होती. लीलाधर कानडे यांनी त्यांच्या गावात हिंदू मुस्लिम समाज कसे ऐकीने राहतात त्यांचे अनुभव सांगितले. तसेच ऍड विजय काबरा यांनी त्यांची गावात हिंदू मुस्लिम बांधवाशी घरगुती संबंध होते असा अनुभव सांगितलं  दिलीपभाऊ सपकाळे यांनी आपल्या मनोगतात सर्व जाती-धर्मातील पंथातील लोक आम्ही वीर सावरकर युनियन युनियन मध्ये एका परिवाराप्रमाणे कित्येक वर्षापासून काम करीत आहोत. आणि  या नात्यातून आम्ही एकमेकाच्या सुखा दुखात हजर असतो आमच्यात् कोणत्याहि प्रकारचे भेदभाव नसून आम्ही सर्व एक आहोत त्याचेच उदाहरण म्हणजे आज आम्ही गो शाळेत केलेली गोसेवा आहे. असेच उपक्रम आम्ही वर्षभर साजरी करत असतो आणि भविष्यातही आम्ही असे प्रतिपादन केले.

 

सुरवातीला सोमनाथ पाटील यांनी सुंदर असे मंत्रमुग्ध करणारे असे बासरी वादन केले.  कार्यक्रमाला वाल्मिक सपकाळे, एडवोकेट सलीम शेख, कदारी फौंडेशनचे फारुख कादरी, अकिल पटेल ,इस्माईल बागवान ,सय्यद रेहमान,सौरभ चवणे, अरुण भोई, सुनील पवार ,रफिक पिंजारी ,भास्कर राठोड ,आकाश पवार ,चुनीलाल पवार ,दानिश पवार,स्वप्निल सोनवणे, संजीव पाटील ,आर आर पाटील, आकाश , भानुदास गायकवाड ,किशोर पाटील, संजय जोशी, अनिल चौधरी, मनोज वाघ ,प्रवीण पाटील, एकनाथ पाटील, अनिल चौधरी, विनोद पाटील ,संजय घुगे ,अफसर शेख ,रमेश सोनार, आयुब मास्तर, राजेंद्र सोनवणे, दीपक तायडे, देविदास भंडारी ,भास्कर ठाकूर ,महेंद्र ठाकूर, कैलास माळी, रत्नाकर वाणी, ललित कानडे, नितेश पाटील, विजय जाधव, महेंद्र ठाकूर, कैलास माळी ,नितेश पाटील,भास्कर ठाकूर, तेजस रावरकर आदी उपस्थित होते.

Protected Content