सामाजिक न्याय पर्वात समाजकल्याण विभागाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १ एप्रिल ते १ मे २०२३ या कालावधीत राज्यभरात सामाजिक समता पर्व साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषगाने सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जळगांव व इंडिअन रेडक्रोस सोसायटी, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, जळगांव येथे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.

 

सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. योगेश पाटील यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, रामानंद नगर पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन  हे होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना रक्तदानाचे महत्व सांगून जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण श्री.योगेश पाटील यांनी केले. तर सदर शिबिरात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी व उपस्थिती नागरिकांपैकी १८ पुरुष व ०२ महिलांनी सहभाग घेउन रक्तदान केले.

 

यावेळी सदर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरीत करून सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक चेतन चौधरी यांनी तर आभार श्रीमती. वैशाली पाटील, गृहपाल, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जळगांव यांनी मांडले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे, गृहपाल एस.आर.पाटील, बाळू बोरसे, दिपक सोनवणे कार्यालयीन सर्व तालुका समन्वयक यांचेसह कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

Protected Content