फोटोग्राफर म्हणतात, आम्हाला बदनाम का करतात ? आता पाळणार हे नियम !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या अनेक समाजसंघटनांमध्ये फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफी करणार्‍यांना टार्गेट केले जात आहे. या पार्श्‍वभूमिवर रावेर येथील बैठकीत छायाचित्रकारांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

 

जळगाव, बर्‍हाणपूर व बुलढाणा या जिल्ह्यातील छायाचित्रकारांची रावेर येथे बैठक पार पडली. यात सद्यस्थितीतील विविध मुद्यांवर मंथन करण्यात आले. नेहमी छायाचित्रकारांवर आरोप केला जातो की छायाचित्रकारांमुळे लग्न समारंभात मोठा वेळ होतो मात्र या लग्नसमारंभांमध्ये इतरही काही असे इव्हेंट सह नियोजनाअभावी वेळ होत असतो

मात्र नेहमीच छायाचित्रकारांनाच लग्न समारंभामधील लोक याचा दोष देतात त्याच अनुषंगाने रावेर येथे जळगाव बुलढाणा व मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर जिल्ह्यातील छायाचित्रकारांनी एकत्र येत एक बैठक घेतली.

 

या बैठकीमध्ये सर्वांना मते लग्न समारंभात या सर्व छायाचित्रकारांनी काही नियम व अटी लागू केल्या आहेत. यापुढे सर्व आमच्याकडून या लग्नसमारंभामध्ये कुठेही वेळ वाया घातला जाणार नाही अशी काळजी घेणार आहेत. तसेच मेहंदीच्या दिवशी पूर्णपणे फोटोग्राफी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यास लग्नाच्या दिवशी गृहप्रवेश चा जो कार्यक्रम आहे तोही छायाचित्रकार १ जून २०२३ पासून शूटिंग करणार नाही. तसेच हळदीच्या दिवशी वेळेचे बंधन असणार आहे दहा वाजेपर्यंतच छायाचित्रकार फोटोग्राफी व्हिडिओ शूट साठी पार्टीकडे थांबतील.

 

लग्न समारंभामध्ये असे काही कार्यक्रम असतात की ज्यामुळे वेळ होतो. काही चुका ह्या लग्न समारंभामध्ये लोकांच्या ही असतात. जसे की लग्नाच्या दिवशी घरून उशिरा निघणे ओवाळणी  मेकअप, वधू व वराची वेगवेगळी एन्ट्री, ग्रुपच्या वेळेस मोबाईल फोटोग्राफी , लग्नाआधी राजकीय लोकांचा सत्कार ,भाषण लग्नामध्ये मध्येच वाढदिवस साजरे करणे या सारखे रिकामे प्रोग्राम बंद केल्यास सर्व लग्न समारंभ हे वेळेवर होतील असा विचार याप्रसंगी मांडण्यात आला.

 

लग्न समारंभांमध्येही लग्न लागताना स्टेजवर छायाचित्रकार संख्या कमी करण्याबाबत ही चर्चा झाली व या पुढे या चित्रकारांकडून लग्न समारंभामध्ये कुठलाही विलंब होणार नाही याचीही ग्वाही या बैठकीत छायाचित्रकारांनी दिली.

 

याप्रसंगी खालील प्रमाणे नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मेहंदीचे शूटिंग पूर्णपणे बंद .

हळदीच्या दिवशी वेळेचे बंधन रात्री दहा वाजेपर्यंत थांबणार .

लग्नाच्या दिवशी बिदाई नंतर गृहप्रवेश यापुढे शूटिंग करणार नाही.

लग्न लागताना स्टेजवर फोटोग्राफर यांची संख्या कमी असणार.

 

या नियमांचे पालन करण्यात यावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

छायाचित्रवारांच्या या बैठकीत बर्‍हाणपूर जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकार तसेच जळगाव जिल्ह्यातील छायाचित्रकार व बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार गोकुळ महाजन , विनोद चौधरी तुषार मानकर, प्रवीण जामोदकर यांनी सर्व छायाचित्रकारांना मार्गदर्शन करत यापुढे गृहप्रवेश वर आपण बंदी करत आहेत या सर्व नियमांचे पालन सर्व जिल्हाभरातील व जिल्ह्यात बाहेरून येणार्‍या छायाचित्रकारांनी असे आवाहन केले. ज्या छायाचित्रकाराने या नियम व अटीचा पालन केले नाही किंवा नियम व अटी मोडल्यास त्याला बाकीचे कोणीही छायाचित्रकार मदत करणार नाही व दंडही आकारण्यात येईल असा इशारा याप्रसंगी देण्यात आला.

 

या छायाचित्रांच्या बैठकीत मयूर पाटील , योगेश नन्नवरे, चंदूभाऊ पाटील , कांतीलाल गाडे ,प्रवीण पाटील , यशपाल परदेशी , सुनील महाजन,  सुनील जगताप , गणेश महाजन ,  आकाश भालेराव , इम्रान शेख , मयूर महाजन , रामदास पाटील , अनिल पाटील , गोपाल पंडित , रुपेश यादव , किशोर राऊत निखिल फेगडे निळकंठ पाटील , विक्रांत मराठे, उमेश कोली रवींद्र पाटील गजानन चौधरी मनोज पाटील राहुल महाजन अवि सपकाळे, एकनाथ सुरडकर, मनोज पाटील यासह जळगाव जिल्ह्यातील जळगाव भुसावळ जामनेर मुक्ताईनगर रावेर यावल व बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नांदुरा व मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर, शहापुर खकणार येथील सर्वच छायाचित्रकार या बैठकीत उपस्थित होते.

Protected Content