श्री गणेशाने मातृपितृभक्ती सिद्ध केली ; हभप सागर महाराज

sagar maharaj

जळगाव, प्रतिनिधी | व्यक्तीच्या आयुष्यात आई वडील हेच आराध्य दैवत असतात हे श्री गणेशांनी त्यांच्या कृतीतून दाखविले आहे. पृथ्वीभोवती फेरी मारून या म्हटल्यावर गणेशाने आई वडिलांभोवती फेरी मारत मातृपितृभक्ती सिद्ध केली असे प्रतिपादन हभप सागर महाराज यांनी केले.

पिंप्राळयाच्या राजाचा मान असलेल्या स्नेहल प्रतिष्ठानचे श्री गणेश प्रतिष्ठापनेचे यंदा १८ वे वर्ष आहे. बुधवारी कीर्तनमालेतील तृतीय पुष्प पारोळा येथील रत्नपिंप्रीचे हभप सागर महाराज यांनी गुंफले. त्यांनी श्रावण बाळाने कावडीच्या सहाय्याने माता-पित्त्याला चारधाम यात्रा घडविली असे सांगत आई वडिलांची सेवा ईश्वर सेवा आहे असे सांगितले. प्रत्येक तरुणाने माता-पित्त्याची सेवा करणे आद्य कर्तव्य असल्याचे यावेळी हभप सागर महाराज यांनी सांगितले. कार्यक्रमात शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. प्रसंगी ज्ञानेश्वर चौधरी, अलका चौधरी, खुशाल पाटील, रविंद्र धनगर, संदीप बागुल, पल्लवी ठोके, रविंद्र महाजन, महेंद्र पारधी यांचा सत्कार सेवानिवृत्त सैनिक आनंदराव देसले, भूजल खात्याचे निवृत्त अधिकारी शालीग्राम जाधव यांचे हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन भूषण लाड, आभार चेतन पाटील यांनी केले. कीर्तन ऐकण्यासाठी पिंप्राळा पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Protected Content