‘तृष्णा हे दुःखाचे कारण’ बुद्धाचा धम्म हेच सांगतो – डॉ. बागुल

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोणत्याही समाजव्यवस्थेमध्ये व्यक्ती हा केंद्रबिंदू ठेवून त्याचा सर्वांगीण उद्धार हाच त्या व्यवस्थेचा अंतिम उद्देश असला पाहिजे. परंतु भारतासारख्या देशांमध्ये जाती, धर्म, लिंग यावर आधारित समाजव्यवस्था व्यक्ती- व्यक्तीमध्ये विषमता व भेदभाव निर्माण करते.परंतु बुद्ध धम्म सांगतो तृष्णा हे दुःखाचे कारण आहे, असे साहित्यिक डॉ.मिलिंद बागुल यांनी व्यक्त केले.

अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान व शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदयात्री अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे पुण्यतिथी व बुद्धपौर्णिमा निम्मित ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले कि, बुद्धांनी आपल्या पहिल्याच उपदेशामध्ये मानवी समाजात असलेल्या विषमतेचे वर्णन करताना सांगितले, की मनुष्यप्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्य्रात राहात आहे. याचाच अर्थ दुःख आणि दारिद्य्र ही व्यक्तीला आणि परिणामी समाजाला अधोगतीकडे नेणारे मार्ग आहेत. आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी सांगितले कि अष्टांगिक मार्ग हा गौतम बुद्धांनी सांगितलेला काम, क्रोध, द्वेष, इ. दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा मार्ग आहे.

यास मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. यावेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, मू. जे महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे, शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्तविक  आभार प्रा. संदीप केदार यांनी मानले.

Protected Content