जळगावात गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागात एकाच वेळी पोलीसांनी पानमसाला व गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे ४ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ, एमआयडीसी आणि शनीपेठ पोलीसात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

एमआयडीसी पोलिसांनी आयोध्या नगर परिसरात प्रमोदकुमार नरेश सैनी (वय १९) याच्या राहत्या घरात छापा टाकला असता त्यात २ लाख ७२ हजार ३०० रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. तांबापुरा भागात मच्छी मार्केट परिसरात गजानन विष्णू भोई (वय ३९,रा.गवळीवाडा) याच्याकडून २ हजार ४२० रुपयांचा गुटखा पकडला तर दिलीप आत्माराम भोई याच्याकडून १ हजार ३२० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. त्याशिवाय शनी पेठ पोलिसांनी नेरी नाका चौकात नितीन भिका महाजन (वय ४६,रा.कासमवाडी) याच्याकडून २ हजार २०० रुपयांचा वाल्मिक नगरात राहूल गोकुळ कोळी (वय २७) याच्याकडून ७ हजार ३१५ तर शनी मंदिर परिसरात चंद्रकांत सुभाष बाविस्कर याच्याकडून २ हजार २२० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर  जिल्हापेठ पोलिसांनी त्यांच्या हद्दीत चार ठिकाणी कारवाई करुन १० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. चारही जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात भजे गल्लीत मुस्ताक रशीद पिंजारी (वय ४९), अल्ताफ अकबर पटेल (वय २३) स्टेडियम संकुलात सुनील बाबुराव विसपुते (वय ४५), चोपडा मार्केटमध्ये ज्ञानेश्वर बन्सी सपके (वय ५२) यांचा समावेश आहे. जिल्हापेठ, एमआयडीसी आणि शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकुण १० ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यात ११ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे ४ लाख रूपये किंमतीचा गुटख हस्तगत करण्यात आला आहे.

Protected Content