ट्यूशन फीच्या नावावर विद्यार्थ्यांना लुबाडणाऱ्या महाविद्यालयावर कारवाईची मागणी

जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे जिल्ह्यासह राज्यात नागरीक हैराण झाले आहे. अशी परिस्थिती असतांना महाविद्यालयाने नवीन प्रवेश देतांना मनमानी पध्दतीने ट्यूशन फीच्या नावाखाली पालक व विद्यार्थ्यांना लुबाडत आहे, अश्या महाविद्यालयांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव ॲड. कुणाल पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात ‘कोवीड-१९’ विषाणू बाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या महामारीच्या काळात शेतकरी, मजुर, मध्यमवर्गीय कुटुंब चाकरमानी या सर्वांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. नागरिकांना पगार कपात जाहली आहे त्यामुळे आर्थिक संकट प्रत्येकाला आहे. अश्या परिस्थितीमध्ये प्रवेश प्रक्रियासाठी महाविद्यालयाकडून ट्यूशन फीच्या नावाने विद्यार्थ्यांकडून पैश्यांची मागणी केली जात आहे.

लॉकडाऊनच्या काळात शाळा, महाविद्यालय ऑनलाइन शिक्षणावर अधिक भर देत आहे. त्यासाठी पालकांकडून मुलांना मोबाइल, रिचार्ज सर्व खर्च करावा लागत आहे. शेतकरी, मजुर हा खर्च कसा करु शकतील, शिक्षण विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार आहे. तो त्याना मिळाला पहिजे कोणीही वंचित राहता कामा नये. म्हणून शाळा व महाविद्यालय फीची मागणी करणाऱ्या महाविद्यालयांवर तत्काळ कार्यवाही करावी, नागरिकांना फी भरण्यासाठी मुदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Protected Content