शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पैलवान अनामिका बनारसेची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे येवला येथे घेण्यात आलेल्या १९ वर्ष आतील मुली विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत ७६ किलो वजन गटात इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची इ.१२ विज्ञान शाखेतील पैलवान कु.अनामिका सुरेश वनारसे प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे सचिव किशोर महाजन यांच्या शुभहस्ते विद्यालयाच्या वतीने ट्रॅक-सूट (किट), रोख ५०१ रुपये भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.आर. चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन. चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन मराठे, क्रीडा विभाग प्रमुख जी.सी. पाटील, बी.पी. बेनाडे, गजानन कचरे, प्रा.समीर घोडेस्वार आदी. मान्यवर उपस्थित होते.

क्रीडा विभाग प्रमुख जी सी पाटील, उच्च माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

Protected Content