मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव (मविप्र) या संस्थेची निवडणूक घेण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. ही निवडणूक घेऊ नये अशी मागणी प्राधिकरणाने फेटाळून लावली आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत अर्थात मविप्र संस्थेच्या संचालक मंडळाचा सन २०१५ ते २०२०पर्यंतचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. पुढील निवडणुकीस संस्था पात्र आहे. तथापि, ही निवडणूक घेऊ नये अशी मागणी विठ्ठल कदम व १६ सभासदांनी केली होती. त्या विरोधात जयवंत भोईटे यांनी हरकत घेतली होती. यासाठी त्यांनी पुण्याच्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे धाव घेतली होती.

यानंतर संस्थेचे सभासद जयवंत भोईटे यांनी ९ सप्टेंबर २०२० रोजी कदम यांच्या मागणीवर हरकत घेतली. संस्थेची निवडणूक घेऊन कदम यांची मागणी फेटाळावी अशी मागणी भोईटे यांनी अर्जातून केली होती. त्यावर प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी कदम यांची मागणी फेटाळली. तर भोईटे यांची मागणी मान्य केली आहे. सध्या कोविड १९ चा प्रादुर्भाव असल्यामुळे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत निवडणूक घेता येणार नाही. त्यानंतर निवडणुकीच्या संदर्भात योग्य ती कार्यवाही कारावी, असे आदेश गिरी यांनी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत, अशी माहिती जयवंत भोईटे यांनी दिली.

Protected Content