पैश्यांच्या वादातून चौघांकडून महिलेला मारहाण; एमआयडीसीत गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । ऊसनवारीने दिलेले पैसे परत दिलेला 2 लाखांचा धनादेश बॅकेत न वटल्याचा जाब विचारण्यास गेले असता, महिलेसह सात ते आठ गुंडानी रामनगरातील ३५ वर्षीय महिलेला लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

भावना जवाहरलाल लोढा (वय-३८) रा. प्लॉट नं. २६, अयोध्यानगर, सईदाबी फारुख पटवे (वय-४०) व मुजाहीद फारुख पटवे (वय-१८) दोघे रा. रा. शिरसोली नाका, डीमार्ट समोर असे संशयित आरोपींची नावे आहेत.

बिलकीस आरीफ पटेल (वय-३५) रा. रुबी अपार्टमेंट रामनगर यांनी ओळखीतून ३० ऑक्टोंबर २०१९ रोजी भावना लोढा यांना ११ महिन्यांनी परत करण्याच्या बोलीवर एक लाख रुपये ऊसनवारीने दिले होते. याबाबत बिलकीस पटेल यांनी 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून घतले होते. तसेच याबदल्यात भावना हिने एक लाख रुपयांचा धनादेशही दिला होता. यानंतर 1 नोव्हेंबर 2011 रोजी भावना हिने एक लाख रुपये मागितले. अशाप्रमाणे बिलकीस पटेल यांनी भावना लोढा हिस एकूण 2 लाख रुपये दिले. याबदल्यात भावना हिने पटेल यांना २ लाखांचा धनादेश दिला होता. यानंतर फेब्रुवारी महिन्यात पैसे परत मागितले असता भावना ही उडवाउडवीचे उत्तरे देत होती. यानंतर बिलकीस यांनी भावना हिने दिलेला दोन लाखांचा धनादेश बॅकेत जमा केला असता, तो बाऊन्स झाला.

त्याबाबत बिलकीस पटेल या भावना हिच्या घरी गेले असता, लोढा यांनी अश्‍लिल शिवीगाळ करत वाद घातला. पैसे मागितल्यास मी स्वतःचा जीव देवून पोलिसात खोटी तक्रार करेन अशी धमकी दिली. यानंतर बिलकीस पटेल यांचा पैशांसाठी पाठपुरावा सुरु होतचा. यात २० ऑगस्ट रोजी भावना लोढा यांच्यासह फारुख पटवे व मुजाहीद फारुख पटवे व ७-८ जणांनी बिलकीस पटेल यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना लोखंडी पाईपने मारहाण केली.

यात बिलकीस पटेल यांच्या आईस दुखापत झाली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकीही संबंधितांनी अशा आशयाच्या बिलकीस पटेल यांच्या फिर्यादीवरुन भावना लोढा यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content