महाविद्यालयातील अनावश्यक शैक्षणिक फी रद्द करण्याची मागणी; इंजिनिअरींग कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक घटकाची आर्थीक विस्कटलेली घडी पाहता महाविद्यालयातील अनावश्यक विविध विभागातील फी रद्द करावी यासाठी आज गुरूवारी इंजिनिअरींग कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळाने अनेकाचे रोजगार बुडाले आहे. त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. महाविद्यालयातील अनावश्यक विविध विभागाच्या शैक्षणिक शुल्क रद्द करावी आणि ट्यूशन फी मध्ये २० टक्के सवलत देण्यात यावी. यासंदर्भात इंजिनिअरींग कृती समितीच्या वतीने अनेक वेळा देवूनही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या संदर्भात आज गुरूवार १७ जून रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून विविध मागण्यांचे निवेदन दिले.

याप्रसंगी इंजिनीअरिंग कृती समितीच्या युवती खांदेश विभागीय अध्यक्ष मयुरी महाजन, जिल्हाध्यक्ष मोनालिका पाटील, उपाध्यक्ष राजपरी खैरे, जिल्हा कार्याध्यक्ष मोहिनी महाले, युवा जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र माळी, तालुकाध्यक्ष चेतन बढे, एरंडोल तालुकाध्यक्ष वरद विसपुते, एरंडोल तालुका उपाध्यक्ष प्रशांत पानपाटील, जळगाव तालुका संपर्क प्रमुख आदित्य थोरात, जळगाव तालुका कार्याध्यक्ष सनी भरंबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content