लोकजागृतीचे व्रत जपताना पत्रकार मुलासह कोरोनाविरोधात मैदानात ! (व्हिडीओ)

एरंडोल प्रतिनिधी । शहरातील पत्रकार रतीलाल पाटील हे आपल्या स्वत:च्या डिजिटल व्हॅनद्वारे एरंडोल शहरातील मुख्य चौकात आणि भागात कोरोनाबाबतच जनजागृती करत आहे. त्यांच्या या उपक्रमाला सर्वांकडून कौतूक होत आहे.

सध्या जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर येथील पत्रकार तथा लाईव्ह ट्रेन्डस न्यूजचे प्रतिनिधी रतिलाल पाटील हे एरंडोल नगरपालिकेच्या मदतीने जनजागृती करत आहे. पहिल्या दिवशी शहरातील संताजी महाराज चौक या ठिकाणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते सदर उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक डॉ.एन.डी.पाटील, रतीलाल पाटील, सौरभ पाटील हे उपस्थित होते. रतीलात पाटील यांनी सदर उपक्रम आपण समाजाचे देणे लागतो व त्यामुळे समाजासाठी जनजागृती करण्याचा विचार मनात आला व सदर उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले. सदर उपक्रम पाटील हे निःशुल्क पद्धतीने राबवत आहेत.त्यांना पुत्र सौरभ पाटील व मित्र भुषण चौधरी हे सहकार्य करीत आहेत.

https://www.facebook.com/508992935887325/videos/1557431707778887

 

Protected Content