अंतुर्ली येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन

anturli news

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली खुर्दे येथे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे दि.४ फेब्रुवारीपासून आयोजन करण्यात आले होते.

 

यात आळंदी येथील संस्थेत शिक्षण घेतलेल्या सुप्रसिद्ध कीर्तनकारानी आपल्या मधुर वाणीतून कीर्तन केले. यात गहूखेडा येथील भागवत महाराज, वेले येथील तुळशीराम महाराज, तुराटखेडे येथील मुरलीधर महाराज, रवंजे येथील विजय महाराज, कडगाव येथील दिनकर महाराज, पोहरे येथील भरत महाराज व वेरूळी येथील ज्ञानेश्वर महाराज यांचा समावेश होता. कमळगाव येथील यशवंत महाराज यांचे उद्या (दि.११) मंगळवारी सकाळी ९ ते ११ दरम्यान काल्याचे कीर्तन होणार आहे. या कीर्तन सप्ताहात पंचक्रोशीतील सर्वच भजनी मंडळांचे सहकार्य लाभले.

आज दि.१० रोजी संपूर्ण गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. कीर्तन सप्तहाचे आयोजक गावातील नवयुवक महाराणा मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ असून या कार्यक्रमासाठी निलगिरीबाबा भजनी मंडळ, जय बजरंग भजनी मंडळ, महाराणा मित्र मंडळ, तालुक्याचे आजी-माजी आमदार व माजी जि.प उपाध्यक्ष यांनी मोलाचे योगदान लाभले. महाप्रसादाचे अन्नदाते मुंबई येथील अशोक नंदा पाटील यांनी यावेळी सगळ्यांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Protected Content