यावल येथे तालुकास्तरीय योग दिवस उत्साहात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । यावल येथे तालुकास्तरीय नुकताच योग दिवस न्यु इंग्लीश स्कुल दोणगाव येथे शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थित उत्साहात साजरा करण्यात आला.

२१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने तालुका पातळीवरील मुख्य कार्यक्रम इंग्लिश मिडीयम स्कुल दोनगांव, तालुका यावल येथे जागतिक योग दिवस शाळेचे संस्थापक अध्यक्ष व सेवानिवृत्त आयुक्त नानासाहेब व्ही. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.

याप्रसंगी योगशिक्षिका अर्चना पाटील यांनी योग प्रकाराचे प्रात्याक्षिक  विद्यार्थ्यासमोर करण्यात आले. संपूर्ण देशात योगदिन साजरा केला जात असून या योगामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून चांगली सवय लागावी, हा शासनाचा चांगला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी नियमित योगा केल्यास विविध प्रकारच्या आजारापासून आपले संरक्षण होऊ शकते व आपले  शरीर सुदृढ होऊ शकते, असे प्रतिपादन अर्चना पाटील यांनी करून विद्यार्थाना योगाचे  महत्व पटवुन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य अशोक पाटील यांनी केले. केंद्रप्रमुख कविता मँडम क्रिडा समन्वयक व श्री दत्त हायस्कूल चिखली बु॥ मुख्याध्यापक के. यु. पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. क्रिडाशिक्षक दिलीप संगेल, उप मुख्याध्यापिका अहिरराव मॅडम, स्नेहा धांडे यांनी विद्यार्थी समावेत स्वःता प्रात्याक्षिक करुन योगासने केली. तर सुंत्रसंचलन सुभाष भालेराव यांनी केले.  यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक हर्षल मोरे, मिलिंद भालेराव सर्व शिक्षकानी परिश्रम घेतले.

 

Protected Content