चिखली येथे विद्यार्थ्यांनी गिरवले योगासनाचे धडे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिखली येथील श्री दत्त हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्व पटवून त्यांच्याकडून योगासनाचे प्रात्यक्षिके करून घेण्यात आले.

 

यावल तालुक्यातील चिखली येथील श्री दत्त हायस्कूल शाळेत योग दिनानिमित्त गावातून मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी योगाचे महत्व पटवून देण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक के. यु. पाटील यांनी प्रास्ताविकातून योग दिवसाचे माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्षात विविध आसनांच्या प्रात्यक्षिकासोबत त्या आसनाने आपल्या जीवनात कसा लाभ होतो, याचे स्पष्टीकरण देत उपशिक्षक एम.व्ही. ठाकुर यांनी प्रत्यक्षात योगासने करुन दाखविली. यावेळी विद्यालयातील उपस्थित सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी आणि विदयार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं योग दिनात योगासने करुन सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी प्रतिभा नारखेडे, के.व्ही. झांबरे, एस.पी. लोहार, डी. पी. नेवे, आर्थर पाटील, रमेश काळे यांच्यासह आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!