भुसावळातील रेल्वे हॉस्पीटल परिसरात गोळीबार ?

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील रेल्वे हॉस्पीटल परिसरात रात्री गोळीबार झाल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी उशीरापर्यंत चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे.

भुसावळ शहरातील रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत पोहचून परिसराची पाहणी केली.

या घटनेची शहानिशा करण्यासाठी शहर पोलीस स्टेशन हद्दीत संशयास्पद परिसराची झाडाझडती घेण्यात आली.तसेच भुसावळ शहरातील हॉस्पिटल व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय मध्ये कुणी इसम उपचार घेण्यासाठी किंवा जखमी अवस्थेत आल्याबाबत तपासणी केली.तसेच ज्या परिसरात गोळीबार झाल्याची गोपनीय माहिती पोलीस अधिकार्‍यांना मिळाली त्या परिसरात अधिकारी तीन तास कसून चौकशी केली.या दरम्यान पोलीस अधिकार्‍यांच्या हाती कुठलीही माहिती लागली नसल्याने शहरात गोळीबार झाला की अफवा आहे हे नेमके गुलदस्तात आहे.

पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे घटनेचा तपास करीत आहेत.

Protected Content