जळगावात लग्नात नाचण्यावरून तरूणावर चॉपर हल्ला; दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापूर परिसरात लग्न समारंभात नाचत असताना तरुणांमध्ये किरकोळ वाद झाले. या वादाचा राग डोक्यात धरुन दोघांनी दिवसांनतर तरूणावर चॉपर हल्ला करुन त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. रविवारी मध्यरात्री २.३० वाजता ही घटना घडली. दोघांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. 

शाहरूख उर्फ अशपाक सलीम खाटीक असे जखमी तरूणाचे नाव आहे. चॉपर हल्लाप्रकरणी सरजील हारुण पटवा व अमीन उर्फ बुलटे पटवा यांनी शाहरुखवर वार केले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटना अशी की, शाहरुख व त्याचा मित्र अब्दुल मजीद मुक्तार बागवान हे दोघे १३ फेब्रुवारी रोजी तांबापुरातील मित्र प्रवीण वाघ याच्या लग्नात गेले होते. यावेळी नाचत असताना शाहरुख व अमीन यांच्यात किरकोळ वाद झाले होते. हे वाद जागेवरच मिटवण्यात आले. १४ रोजी अमीन याने शाहरुखचा मित्र अब्दुल याला फोन केला. शाहरुख याला मला फोन करायला सांग असा निरोप दिला. तर १५ रोजी मध्यरात्री २.३० वाजता अमीन याने थेट शाहरुख याला फोन केला. तुझा मित्र अब्दुल याचा मोबाईल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा असा निरोप दिला. त्यानुसार शाहरुख घराबाहेर पडला. यावेळी आधीच बिसमिल्ला चौकात बाहेर उभ्या असलेल्या सरजील याने शाहरुखला पकडून ठेवले तर अमीन याने कमरेतून चॉपर काढत शाहरुखवर पाच-सहा वार केले. यात शाहरुखच्या पोटावर, चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. शाहरुखच्या ओरडण्याच्या आवाजामुळे त्याची आई नसीम खाटीक बाहेर आली. यानंतर गल्लीतील इतर लोक जागे झाल्यामुळे सरजील व अमीन तेथुन पळुन गेले. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या शाहरुखवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नसीम खाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरजील व अमीन यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content