जळगाव बसस्थानकातून विवाहितेचे पर्समधून 72 हजाराचे सोन्याचे दागिने लांबविले

जळगाव प्रतिनिधी । सिल्लोड येथे जाण्यासाठी निघालेल्या शिवकॉलनीतील विवाहितेच्या पर्समधून ७२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरून नेल्याचा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, संगीता अशोक विभांडीक (वय-४२) रा. शिवकॉलनी, जळगाव हे पती अशोक विभांडिक यांच्यासोबत सिल्लोड जि. औरंगाबाद येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी आज सोमवार १५ फेब्रुवारी दुपारी १ वाजता आल्या. दुपारी २ वाजता सिल्लोड बस लागली. त्यावेळी पतीसह त्या बसमध्ये चढत असतांना अज्ञात  चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चैन उघडून ७२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे झुंबर, मण्यांची पोत, सोन्याची ठुशी आणि दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकुण २५ ग्रॅमवर सोन्याचे दागीने लंपास केले. तिकीटाचे पैसे देण्यासाठी पर्समध्ये हात घातला असता. सोन्याचे दागिन्यांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. तातडीने दोघांना जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून सविस्तर माहिती दिली. याप्रकरणी संगिता विभांडिक यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस कर्मचारी करीत आहे. 

Protected Content